निर्मल ग्रुप ग्रामपंचायत गिम्हवणे- वणंद, तालुका दापोली , जिल्हा रत्नागिरी
आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९७५.
ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
गिम्हवणे ग्रामपंचायत ही गिम्हवणे व वणंद या दोन गावांचा समावेश असलेली समूह ग्रामपंचायत आहे. दापोली शहराच्या अगदी हद्दीला लगत असल्यामुळे या परिसराचा विकास वेगाने होत आहे.
वणंद हे गाव माता रमाई यांचे जन्मगाव म्हणून ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
गिम्हवणे हे शैक्षणिक, सामाजिक व व्यापारी दृष्ट्या प्रगत होत असून दोन्ही गावांची लोकसंख्या, संसाधनं व परंपरा एकत्र येऊन ही ग्रामपंचायत अधिक सशक्त होत आहे.